हिवरखेड येथे विविध ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जात असून येथील विवेकानंद कोचिंग क्लास ,हरीईच्छा कोचिंग क्लास,बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या पत्नी सोबत म्हजणेच आपल्या जोडीदाराच्या सोबत येथील गणरायाची महाआरती करायचा बहुमान देण्यात आला, तसेच हरीइच्छा क्लासच्या वतीने येत्या १८ सप्टेंबरला येथील विद्यार्थ्यांचा वाढदिवस इतर कामात पैसे गमावून साजरा न करता गरजू महिलांना साडीचोळी वितरित करण्यात येतील तसेच विवेकानंद क्लासच्या वतीने प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना शालेय वही पुस्तके मोफत वितरीत करण्यात येतील तसेच हरीईच्छा क्लास याच्या वतीने ज्या गरजू विद्यार्थ्यांना शिकायची इच्छा आहे अशा १,ते १० च्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्याचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च या क्लास च्या माध्यमातून होईल असे आव्हान पवन महाराज सोनोने, विजय तायडे सर यांनी केले, यावेळी उपस्थित विनोद मंडवाले, अर्जुन खिरोडकार, पल्लवी खिरोडकार हे होते,
हिवरखेड येथे २१ जोडीदाराच्या हस्ते महाआरती,बाल गणेश उत्सव मंडळ विवेकानंद क्लासचा हा उपक्रम,लवकरच वृध्द आश्रमाची हिवरखेड मध्ये निर्मिती,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.