पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-मंगल काकडे.
दिनांक २३ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम बापूमिया पटेल यांच्या मार्गदर्शनाने व सहसचिव रब्बानी देशमुख प्राचार्य डॉ.आई ए राजा यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयांमध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी यांनी सशक्त भारत चळवळ मोहिमेअंतर्गत धावणे आणि चालण्याची स्पर्धा पूर्ण केली आणि यानंतर आम्ही दररोज दोन किलोमीटर धावणार आणि इतरांना सुद्धा धावण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी जागृत करणार अशी शपथ घेतली सोबतच मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी केली मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एम बी इंगळे यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक जितेंद्र कचवे व शारीरिक शिक्षिका सिंधू राऊत यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय खेळाडू सुहास राऊत याने गोवा येथे झालेल्या नॅशनल स्पोर्ट युथ चॅम्पियनशिप 2021 मध्ये टायकोंडो या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले त्यामुळे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच या खेळाडूने तायकांदो या खेळाचे चे प्रदर्शन विद्यार्थ्यांना करून दाखविले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मुख्याध्यापक तडवी हज़्जन जैतुनबी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य तृप्ती भोपळे डे कॉलेजचे समन्वयक शोएब मोहम्मद व आय क्यू ए सी कॉर्डिनेटर अझरुद्दीन काजी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी केले
