मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आला पूर..

 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-सुरज देशमुख R.C24  न्युज

बुलढाणा तालुक्यातील येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. त्यामुळे बुलढाणा - चिखली मार्गावरील येळगाव टोलनाक्या जवळ पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाने वाहतूक थांबवली आहे.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. सकाळपासून चिखली  - बुलढाणा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. तसेच बुलढाणा तालुक्यात रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


Previous Post Next Post