सरपंंचपतीची कामकाजात ढवळाढवळ.गटविकास अधिकार्‍याकडे तक्रार.पुराव्यादाखल चित्रफित समाज माध्यमावर पसरली.सिसीटिव्ही कॅमेरे बंद करण्याचा प्रताप...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

शासनाने महीलाना राजकिय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीत स्थान जरी दिले तरीही पुरुषांची मक्तेदारी कायमच असल्याचे दिसुन येते. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महीलाची निवड निव्वळ देखाव्यापुरती असुन सरपंचपतीच गाडा हाकतात किंवा कामकाजात ढवळाढवळ करतात हे मात्र निश्चीत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ (१) नुसार महीला सरपंचाच्या कामात सरपंचपती हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार अचलपुर गटविकास अधिकारी यांचे कडे पथ्रोट येथील तक्रारकर्त्यानी केली.पथ्रोट ग्रामपंचायतची एकुण १७ सदस्य संख्या असुन १० महीला व ७ पुरुष सदस्य असताना भाजपा समर्थीत जयसिंग विकास पॅनल सत्तारुढ आहे. शासनाच्या नियमा नुसार मागासवर्गीय महीला सरपंचपदी सौ नंदा महेश राऊत या सरपंचपदी आहे. तेजराज प्रल्हाद गोरले, प्रणव धर्मेंद्र हावरे यानी गटविकास अधिकारी अचलपुर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार महीला सरपंच असल्याने त्या नियमीत दररोज हजर राहु शकत नसल्याची सबब सांगत सरपंच पती स्पष्टीकरण देतात. सरपंचांच्या अनुपस्थीतीत महत्वाच्या कागदपत्रावर स्वतः सरपंचाची सही करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.सरपंच पती दररोज ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचाच्या दालनात हजर असल्याचा पुराव्याचे चित्रीकरण तक्रारकर्त्या कडे असुन ती समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यांच्याच आदेशावरुन ग्रामपंचायत आवारातील सिसिटिव्ही कॅमेरे बंद केल्याचे तक्रारित नमुद आहे. गंभीर आरोप असलेल्या तक्रारीची दखल घेवुन त्वरीत कारवाई व कॅमेरे पुर्ववत सुरु करण्याची मागणी तक्रारदारा सह ग्रामस्थ करीत आहे.

   **कॅमेरे बंद असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी सौ.हर्षदा बोंडे याना विचारणा केली असता कॅमेरे बंद असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. याबाबत स्पष्टीकरण देताना सांगीतले की आधीचा डिव्हीआर कृष्णधवल असुन अस्पष्ट दिसत होते लगेच दुसरा बदलवुन घेतल्या जाईल.**

**सरपंचपती श्री महेश राऊत याना विचारणा केली असता मी कुठल्याही कामात हस्तक्षेप करत नाही तसेच तक्रारकर्त्याना कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही सोबतच कॅमेरेही बंद केले नाही सदर तक्रार बिनबुडाची आहे.**

संबंधीत तक्रार शुक्रवारी प्राप्त झाली असुन कार्यालयीन कामकाज व मासीक सभेमुळे थोडा विलंब झाला असुन लवकच चौकशी करण्यात येईल. - जयवंत बाबरे गटविकास अधिकारी अचलपुर पं.समीती.**

Previous Post Next Post