अस्वलीच्या हल्ल्यात पाटकहुचा बन्सी गंभीर जखमी...

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी पासून पस्तीस किमी अंतरावर असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पाटकहू येथील बन्सी भोला सावलकर वय 40 यांच् शेतकऱ्यावर  अस्वलीने जीवघेणा हल्ला केल्याने तो गंभीर जख्मी झाला आहे.पाटकहू येथील बन्सी भोला सावलकर हा आपल्या शेतात जागरण साठी गेला असता सकाळी शेताच्या बाजूला असलेल्या नाल्याकडे पाण्यासाठी जात असताना अस्वलीने अचानक पाठीमागून येऊन हल्ला केला त्यात बन्सी  सावलकर पडला व त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तो गंभीर जख्मी झाला. त्याने जोराने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावून अस्वलीला पिटाळून लावले. व लगेच हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यावर उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने बन्सीला अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

 

Previous Post Next Post