दी १५/९/२०२१/रोजी चिखलदरा तालुक्यातील ग्राम मलकापूर येथे जीवन विकास संस्थेचा जीवन प्रकल्पा अंतर्गत सेंद्रिय शेती कार्यशाळा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले गेल्या १ दशकापासून जीवन विकास संस्था मेळघाटातील आदिवासी समुदायाचे आर्थिक, सामाजिक, उत्थान करिता विविध विषयावर काम करून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे सेंद्रिय शेतीला वाव मिळावा या दृष्टीकोनाने महिला शेतकऱ्यासाठी एक दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिवन प्रकल्पाचे समन्वयक श्री रविकिरण मोरे, केंद्र प्रमुख फा बिपिन जिवन स्टाफ सुरेश झामरकर, साधुराम खडके,हे उपस्थित होते रविकिरण मोरे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये महिलांना सेंद्रिय शेतीचे महत्व व फायदे सांगितले त्यानंतर बिपिन यांनी पारंपरिक व मिश्र शेती विषयी बोलताना जिरो बजेट फार्मिंगचे महत्व सांगितले.त्या नंतर सुरेश झामरकर यांनी भूमी संस्कार, बीज संस्कार, पोषण संस्कार, जल संस्कार, व सुरक्षा संस्कार हे सेंद्रिय शेतीचे मुख्य ५आधारस्तंभ आहे हे सिद्धांत ज्या शेतकऱ्यांना कळले ते नक्कीच सेंद्रीय शेतीत यशस्वी होऊ शकते जीवामृत तसेच विविध जैविक खत टॉनिक, औषधी ई आपण घरीच उपलब्ध संसाधनापासून कमी खर्चात बनवू शकतो जेणे करून पैशाची बचत होवून उत्पादन वाढेल व जमिनीची पोत सुधारण्यास मदत होईल विविध प्रकारच्या पाला पाचोळ्या पासून हिरवळीचे दर्जेदार खत तयार करून ते आपल्या शेतात आपण सहजरीत्या वापरू शकतो या वर बोलताना महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती पद्धती विषयी सविस्तर माहितीआवर्जून सांगितले तसेच जीवामृत, लमित अर्क, ताक संजीवक, ई जैविक औषधी प्रत्यक्ष तयार करून दाखवण्यात आली तसेच पोषण परसबाग विषयी महिलांना माहिती दिली त्यानंतर सेंद्रीय शेती करणाऱ्या काही महिला शेतकऱ्यांचे व्हिडिओ क्लीप यावेळी दाखवण्यात आली कार्य क्रमाचे संचालन साधुराम खडके यांनी केली तर नामदेव बेलसरे, सोणकलाल जी अमोल यांनी प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सेंद्रिय शेती प्रशिक्षणा मध्ये महिला शेतकऱ्यांचे उत्त्फुर्स प्रतिसाद...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी