खामगाव गो. से. महाविद्यालयात पोषण आहार मासानिमित्त रानभाजी महोत्सव. हल्लीच्या काळात शेती पिकांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारणी केली जाते. कीटकनाशक फवारणीमुळे भाजीपाल्यांमधील पोषक द्रव्ये कमी झाल्याने विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. आधुनिकतेच्या नादापाई सहज आणि आपोआप उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे अशी खंत रानभाजी अभ्यासक तथा विक्रीकर अधिकारी मा. शीतल पडोळ यांनी येथे व्यक्त केल. स्लाईड शो द्वारे विविध रानभाजी, कंद, फळांची माहिती त्यांनी दिली.विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे आयोजित रानभाजी महोत्सव प्रदर्शनी व विक्री-२०२१ उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या. या मोहत्सवाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, प्रमुख उपस्थिती निसर्ग संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. नीताताई बोबडे, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे निसर्ग मित्र शेतकरी मनोज सुळोकार यांची उपस्थिती होती.मा.निताताई बोबडे यांनी बोलताना म्हटले की, असा महोत्सव गो.से. महाविद्यालयात होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. ह्या मोहत्सवाच्या माध्यमातून स्थानिक रानभाज्यांचे संवर्धन व प्रचार-प्रसार करण्यासाठी सालाईनबनच्या धर्तीवर कार्य करावे. यावेळी सुळोकार यांनी स्थानिक रानभाज्या बदल माहिती दिली. प्रा. तळवणकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना तरुणाई फाउंडेशन व निसर्ग संस्था यांच्या सहकार्याने या महोत्सवाला वनस्पतीशास्त्र विभाग, गृह अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक पडघन यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. हनुमंत भोसले तर आभार गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. नीता बोचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.कुटेमाटे, प्रा.शिंगणे प्रा.सपकाळ यांनी सहकार्य केले.यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांचा मनमुराद आस्वाद घेतला. राणभाजी प्रदर्शनीला विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुभाष बोबडे, सचिव डॉ.प्रशांत बोबडे, तरुणाईचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.
सदृढ आहारासाठी रानभाज्या सेवन गरजेचे-शितल पडोळ...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख