पार्वतीसारखा पती मिळाण्याकरीता कुमारिकानी केली हरतालीका साजरी.हरतालीका उत्साहात साजरी...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा व विद्यमान पती भगवान शिवशंकरा प्रमाणे रहावे म्हणून आज हरतालीका व्रत कोरोनाकाळातही कुमारिकासह सवाष्ण महीलानी साजरा केला.हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत्  या भावनेने हरितालिकेची पूजा केली जाते. या करीता सवाष्ण महीला व कुमारीका सकाळी नदीवर जाउन स्नान करुन नदीपात्रातील रेती घरी आणुन विधीवत पुजन करुन शिवपिंड तयार केल्या जाते. त्या शिवपिंडाची पुजा करुन ५२ प्रकारच्या वनऔषधींची पाने व धोतरा कन्हेर  पुष्प प्रत्येक महीला व कुमारीका अर्पण करतात. रात्रभर भजन जागरण करुन झिम्मा फुगडी खेळण्यासह मौज, आनंद उपभोगतात. शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची असते. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तामिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात.उत्तर भारताह काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा, कोकण, सिंधुदुर्ग किनारपट्टी व उर्वरीत महाराष्ट्र, गोवा राज्यातही हे व्रत केले जाते. भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात.

Previous Post Next Post