जलंब रेल्वे गेट दुरुस्तीच्या कामामुळे आज पासून ५ ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीसाठी रस्ता बंद...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुरज देशमुख R.C24 न्युज 

शेगाव : जलंब येथील रेल्वे गेटच्या  दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बुधवार दिनांक २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत शेगाव जलंब आणि खामगाव जलंब रेल्वे गेट येथून वाहतुकीसाठी रस्ता बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जलंब रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या रेल्वे गेटच्या दुरुस्तीच्या कामामुळे आज बुधवार २९ सप्टेंबर पासून ५ ऑक्टोंबर पर्यंत शेगाव येथून जलंब तसेच खामगांव येथून जलंबकडे येण्यासाठी रेल्वे गेट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहनधारकांनी या बाबत योग्य ती दक्षता घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.जलंब रेल्वे गेटवरील कामामुळे पूर्णपणे रस्ता बंद राहिला तर पर्यायी व्यवस्था जाण्या-येण्यासाठी नाही. त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट दुरुस्तीचे काम रात्रीच्या वेळी ठराविक वेळेत केल्यास नागरिकांना प्रवासाची समस्या येणार नाही याप्रकारे नियोजन करावे अशी मागणी जलंबच्या सरपंच मंगला घोपे यांनी केली आहे.

Previous Post Next Post