जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जा शहरातील प्रभाग क्र ९.सुपो काॅलनी मधील सार्वजनिक वापराच्या ओपन स्पेस मधे सुशोभीकरण व स्वच्छता करण्यासाठी नगर पालिका जळगाव जा यांना युवा सेनेच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर रोजी निवदेन देऊन ओपन स्पेस मध्ये सुशोभीकरण व स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा ईशारा दिला.नगर पालिका क्षेत्रात असलेल्या सुपो काॅलनी मधील ओपन स्पेस बर्याच वर्षांपासून नागरीकांनी येथील नियमित टॅक्स भरूनही भकास अवस्थेत पडुन आहे. शहराच्या मुख्य वस्तीतील हा ओपन स्पेस शहराचे विद्रुपीकरण करत आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या घोषणा देणारे नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी मात्र याकडे सतत दुर्लक्ष करतांना दिसून येते. शहरात वाढणारा डेंग्यू - मलेरीया ओपन स्पेस मधील घानीमुळे वाढत आहे, यामुळे आजुबाजूला असलेल्या नागरीकांना आरोग्याचा धोका वाढतो आहे.या ओपन स्पेसला सद्य स्थितीत तलावाचे स्वरूप आले आहे, सदर निवेदनाची दखल या नगरपालिका प्रशासनाने न घेतल्यास युवासेनेच्या वतीने येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवासेना तालुका प्रमुख विशाल पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनाला दीला. यावेळी चाँद कुरेशी, दिपक बावस्कार, संकेत रहाटे, युवराज देशमुख,गोपाल ढगे,मंगेश कतोरे,शेख अनिस,रामकृष्ण वंडाळे,सुभाष माने, अनिंत माने ई. शिवसैनिक अपस्थित होते.
