जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यात कुशीत वसलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्राम भिंगारा येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी विहिरीमध्ये 20 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तरंगत असताना तेथील नागरिकांना दिसला असता नागरिकांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली. भिंगारा येथील पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशन ना कळविली व सदर घटनेची फिर्याद महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे,पोलीस कॉन्स्टेबल संजय राऊत, पोलीस शिपाई सचिन राजपूत पोलीस शिपाई सुनील वावगे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सदर महिलेचे शव विहिरीतून बाहेर काढले. व पंचनामा केला असता सदर महिलेचा मृतदेह अतिशय वाईट स्थितीमध्ये होता म्हणून घटनास्थळावर च जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून सदर महिलेचे शवविच्छेदन घटनास्थळावर च करण्यात आले. सदर मृतक महिलेचे नाव संतुबाई राजाराम डावर रा.भिंगारा वय २२ वर्षे आहे हि महिला शनिवार दिनांक ११ सप्टेंबर च्या रात्रीपासून बेपत्ता होती. सदर महिलेच्या मृत्यूप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी ६८/२०२१ मर्ग दाखल केला असून सदर महिलेचे लग्न २ वर्षापुर्वी भिंगारा येथील च राजु डावर या तरुणासोबत झाले होते तसेच.महिलेला एका वर्षाची मुलगी आहे.मृतक विवाहितेच्या भावाने जळगांव पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली की माझ्या बहीणीला तिचा पती नेहमी दारु पिवुन शिवीगाळ करीत असे.तसेच दारु पिवुन मारझोड करीत होता.त्याच कारणाने त्रासुन माझ्या बहिणीने ग्रामपंचायत जवळील सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.मृतक विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून मृतक विवाहितेच्या पतीविरोधात अप.नं-७६१/२०२१ कलम ३०६,४९८(अ) भादवि नुसार राजु सुरपाल डावर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर व पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार हे करीत आहेत.
पतीच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन.भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी केले मृतक महिलेच्या पतीला जेरबंद...
जळगांव जा.प्रतिनिधी:-