हिवरखेड ग्रामपंचायतने दोन ग्रामपंचायती करण्याचा ठराव रद्द होण्याकरिता लोकशाही दिनी नागरिकांचे मुंडन आंदोलन..!नगरपंचायती साठी मेडिकल असोसिएशनने दिले पत्र..!

हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड ग्रामपंचायतीने गावात दोन ग्रामपंचायती करून गावाचे दोन तुकडे करण्याच्या घेतलेल्या अफलातून ठरावा विरुद्ध निषेध म्हणून व हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये तात्काळ होण्याकरिता आज लोकशाही दिनाचे औचित्य साधून येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या समोर कोविड १९ च्या नियमांचे पालन करून मुंडण आंदोलन केले.हिवरखेड शहराला मूलभूत सुविधा मिळाव्या तथा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गेल्या 22 वर्षापासून हिवरखेड वासी नगरपंचायत होण्यासाठी संघर्ष करीत आहेत त्यामध्ये अनेक सरपंचांनी व सदस्यांनि पदावर कार्यरत असताना सुद्धा नगरपंचायत होण्यासाठी मासिक सभा तथा ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत यासह येथील अनेक पक्ष, सामाजिक संघटना,पत्रकार संघटना व जागरुक नागरिकांनी हा लढा गेल्या 22 वर्षापासून अविरत ठेवला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी घेतलेल्या वादग्रस्त ग्रामसभेत दोन ग्रामपंचायती करण्याचा अफलातून ठराव घेण्यात आला एवढेच नाही तर सदर ठराव तब्बल तीन दिवसांच्या आत मंत्रालयात सुद्धा पोहोचविण्यात आला या वादग्रस्त ठरावामुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून सत्तेच्या लालसेपोटी गावाचे दोन तुकडे करू पाहणाऱ्या च्या विरुद्ध काही संघटना व पक्षांनी बंड पुकारला व विविध आंदोलने केली त्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गावाचे दोन तुकडे करण्याचा ठराव रद्द करण्याबाबत व नगरपंचायत होण्याबाबत मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तथा ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले , ग्रामपंचायतीच्या पायर्‍यांवर बसून हातात नगरपंचायत जनजागृतीचे पत्रके घेऊन मूक आंदोलन करण्यात आले तसेच सोशल मीडियावर नगरपंचायत जागृती बाबत बॅनर लावून प्रचार सुद्धा करण्यात आला काही संघटनेकडून नगरपंचायत मुळे गावकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचे पत्रके छापून ती गावभर वितरित करण्यात आली. अनेक गावकऱ्यांनि सोशल मीडियावर नगरपंचायत होण्यासाठी विविध पोस्ट टाकून सुद्धा आंदोलने केली. त्याच अनुषंगाने आज काही हिवरखेड वासीयांनी ग्रामपंचायतीच्या निषेधार्थ तथा नगरपंचायत होण्यासाठी आज लोकशाही दिनी मुंडण आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले. येथील मेडीकल असोसिएशन ने सुद्धा आपल्या स्वाक्षऱ्यांचे नगरपंचायत होण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे मात्र हि सर्व आंदोलने करीत असताना ग्रामपंचायतीकडून ही आंदोलने दडपण्याचा  वारंवार  प्रयत्न सुद्धा करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी देऊन नगरपंचायत होण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलने करण्यात येणार असल्याचा मानस आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखविला. मुंडण आंदोलनादरम्यान कोणालाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलिसांकडून कोविड १९ च्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिसांनी त्यांचे कार्य पार पाडले,

🔷प्रतिक्रिया🔷

ग्रामसभा घेण्याचा संपूर्ण अधिकार हा सरपंच  यांचा आहे सरपंच कधीही ग्रामसभा घेऊ शकतात तथा विशेष ग्रामसभा घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन मागितले असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर विशेष ग्रामसभा घेण्याबाबात सरपंच निर्णय घेतील.

गजानन मेतकर,ग्रामविकास अधिकारी

हिवरखेड नगरपंचायत व्हावी या करीता मी मूडन आंदोलन केले, आणि दोन ग्रामपंचायत होण्याचा ठराव रद्द पाहिजे,

मुडनकर्ते 

श्रावण कवळकार हिवरखेड

 

Previous Post Next Post