सरपंचबाई देतात उडवाउडवीची उत्तरे म्हणून ग्रामस्थांनी दिली गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांना तक्रार..


 जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

जळगांव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द ग्रामपंचायत बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे त्यातच आज दिनांक२७ सप्टेंबर रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना कुरणगाड खुर्द येथील अजय देवळे सह इतर नागरिकांनी अर्ज केला कि काहि शैक्षणिक कामाच्यासाठि सरपंच बाई यांना रहिवासी दाखला व काही महत्वाच्या कागदपत्रांवर सहि घेण्यासाठी त्यांच्या घरि गेलो असता बाईंनी थेट सांगितले कि माझे पती घरि नाहीत व ते आल्याशिवाय मि दाखला किंवा सहि व शिक्का देत नाही पति आले कि तेच देतील असे म्हणुन उडवाउडवीची उत्तरे देत असतात असे अर्जात नमूद केले आहे तसेच यापूर्वी सुद्धा बर्याच वेळा सरपंच यांच्या विरोधात तक्रारि दाखल आहेत यासाठी गटविकास अधिकारी यांनी या ग्रामपंचायत कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे पुढे अर्जात सरपंच यांची चौकशी करून कारवाई ची मागणी केली आहे.

Previous Post Next Post