मेळघाटात परतवाडा आगाराची नादुरुस्त भंगार बसेस.जंगलात ताटकळले प्रवासी, अनेकानी धरली घरची वाट...

राजु भास्करे /चिखलदरा


जुन्या आणि भंगार झालेल्या परतवाडा आगारातील बसगाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. त्याचा अनुभव पुन्हा रविवार सकाळी भुत्रूम परतवाडा बसफेरीला आला. नादुरुस्त बसमुळे महत्त्वपूर्ण कामासाठी निघालेले आदिवासी प्रवासी जंगलातच अडकले.
परतवाडा आगाराची एम एच ०७सी १४६१ क्रमांकाची हतरू - भुत्रूम बसफेरी रात्री मुक्कामी होती. रविवारी १० वाजता ४० पेक्षा अधिक प्रवासी घेवून ती परत निघाली डोमा गावानजीक ही बस नादुरुस्त झाली. परतवाडा ते भुत्रूम हे अंतर १२० किमी आहे.
ही एकच बसफेरी असल्याने अतिदुर्गम चिलाटी, कुही, डोमी, कांरजखेडा, चुरणी, जारीदा अशा गावातील आदिवासींना महत्त्वपूर्ण आहे. मेळघाटात नादुरुस्त आणि भंगार बसगाड्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आधीच बोटावर मोजण्याएवढ्या बसफेऱ्या कोरोना पश्चात मेळघाटात सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातही भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या पाठविणाऱ्याविरुध कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भक्ते यांनी केली आहे.
मध्यरात्री पासून जागतात आदिवासी
चिखलदरा, धारणी, परतवाडा, अमरावती या जिल्हा व तालुका मुख्यालयी महत्वपूर्ण कामासाठी ये-जा करण्यासाठी आदिवासींना मध्यरात्री पासूनच जागे राहावे लागते. पहाटे उठून काही अंतर पायी चालून बस पकडावी लागते. त्यावरही कळस म्हणजे नादुरुस्त आणि भंगार बसगाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने आदिवासी मध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
--------------
अतिदुर्गम हतरू परिसरात एकच बस फेरी सुरू आहे. भंगार आणि नादुरुस्त बसफेरी यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. महामंडळाच्या या गलथान कारभारामुळे आळा घालावा.
स्वप्नील भक्ते
समाजिक कार्यकर्त्यां

उपाशी प्रवाशी अर्ध्यावरच अडकले.
भुत्रूम येथून पहाटे ७ वाजता निघालेली बस दहा वाजता डोमा गावानजीक नादुरुस्त झाली. दुपारी १ वाजेपर्यंत दुसरी कुठलीच बस किंवा खाजगी वाहन न मिळाल्याने आदिवासींना ताटकळत बसले. अर्ध्यावर थांबलेल्या या प्रवाशांना वाहकाने तिकिटाचे पैसे परत केल्याची सुध्दा माहिती आहे. काहींनी येथूनच गावी परतण्याचा निर्णय घेतला.
Previous Post Next Post