दिनांक 5 सप्टेबर शिक्षक दिवस शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जळगांव जिल्हा यांच्या माध्यमातून वरणगांव येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. यावेळेस बाळासाहेब चव्हाण सर ह.की.बढे विद्यालय पिंपळगाव, विलास गावंडे सर,संदीप हळदे सर म.गांधी विद्यालय वरणगांव, विनायक देशमुख सर, रजनी सुरेश झाम्बरे मॅडम गं.सां.चौधरी विद्यालय वरणगांव वायर पाटील सर महात्मा गांधी विद्यालय वरणगाव अविनाश देशमुख सर वरणगाव आदी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. गुरूंना आपल्याकडे न बोलावता त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सन्मान करावा असा मानस होता. गुरूंचे ऋण फेडता येणार नाहीच मात्र त्यांचा सन्मान करणे हा उद्देश आहे असे प्रतिपादन अरूंनाताई इंगळे यांनी यावेळेस केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष सौ.प्रतिभा तावडे, युवक जिल्हाउपाध्यक्ष वाय.आर.पाटील सर, भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, वरणगांव न.पा. माजी नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे, वरणगांव महिला शहर अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, रवी पाटील, दिलीप गायकवाड, महेश सोनवणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या शिक्षकाचे ऋण फेडण्यासाठी शिक्षकाच्या घरी..
वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ