मेळघाटात धारणी व चिखलदरा तसेच अचलपूर तालुक्याचा काही भाग येतो यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोरोना काळात शाळा सुरू झाल्या असून यामधे काही पदाधिकारी शाळेवर दौऱ्या करण्या करीता जात असेल हे साहजिकच आहे. परंतु मेळघाटात कोणते पदाधिकारी शाळेतील शिक्षकांना पैसेची मागणी करीत आहे. व कोणाच्या माध्यमातून करीत आहेत. हे येथिल शिक्षकाने जिल्हा परिषद अमरावती ला येवून तक्रार करावी जने करून बाकीच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी होणार नाही. काही वृत्त पत्रात ही बातमी आली आहे कि मेळघाटातील काही जिल्हा परिषद पदाधिकारी शाळेतील शिक्षकांना अधिकाऱ्याच्या माध्यमातून वसली करीत असल्याचे त्रास देत आहे. परंतु मेळघाटातील कोणत्या तालुक्याचे पदाधिकारी शाळेतील शिक्षकांना पैसे ची मागणी करीत आहे. हे पण सविस्तर बातमी पत्रात छापून यायला पाहिजे जने करून बाकीच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी होणार नाही. असे मत मेळघाटातील एका पदाधिकाऱ्याचे आहे.
मेळघाटातील पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा षडयंत्र...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी