हिवरखेड मध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थी पासून तर १० दिवस अनंत चतुर्थी पर्यत आपण गणरायाचा उत्सव साजरा करत असतो, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावंट असल्याने मूर्तीकार हे शासनाचे आदेश पाळत तेवढ्याच मूर्ती बनवितात जेवढ्या विक्री जातात हिवरखेड मध्ये व परिसरात मात्र मूर्ती कलावंतांच्या गणेश मुर्त्या मध्ये कमी पडल्या अनेकांनी बेलखेड ,तेल्हारा, माळेगाव, अडगाव ,आकोट कडे धाव घेतली यावरून हे सिद्ध झाले मागील वर्षी पेक्षा यावर्षी गणेश उत्सवात वाढ झाली प्रत्येक भक्तांच्या घरी बाप्पा विराजमान झाले व प्रत्येक मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे, हिवरखेड मध्ये गणेश मूर्तीचा शॉर्टएश आल्याने काही भाविकांनि ,लाल सुपारीला गुलाल लावून आपली श्रद्धा भक्ती ठेवून गणेश उत्सव साजरा करत आहेत, तर वेळेवर काहीं कलावंतांनि हाताने मातीचे गणपती तयार करून गणेश उत्सवात आणखी रंगत आणली, या वर्षी अधिक हिवरखेडकर गणरायाच्या भक्तीत मग्न झाल्याचे दिसून येते बाप्पा आपल्या भक्तांच्या आजही मनोकामना पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे,
आमचं मंडळ नेहमी दरवर्षी वेळेवर साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करायची भूमिका घेतो आणि यावर्षी तर मात्र आम्हाला आमच्याच गावात मूर्ती न मिळाल्याने वेळेवर आमची धावपळ झाली आणि पावसात आम्ही तेल्हारा गेलो व तिकडून व्यवस्थित रित्या छान मूर्ती आणली,
कैलास देशकर,
(विकास मैदा नगणेश उत्सव मंडळ उपाअध्यक्ष)
कोरोनाचे नियम पाळत मागील वर्षी मुर्त्या उरल्या होत्या मात्र यावर्षी तेवढ्याच मुर्त्या करून गणेश मूर्तीत शॉर्टस आला, वेळेवर मूर्ती करणे अवघड होते ,म्हणून जेवढ्या बनविल्या त्या सर्व मुर्त्या संपल्या आणि आमच्या घरच्यासाठी वेळेवर छोटी मूर्ती बनविली व घरी बसविली मात्र गणेश भक्तांच्या उत्सवावरून यंदाचा नवरात्र उत्सवाचा अंदाज कळला
नीलकंठ सोनोने,
(मूर्तिकार हिवरखेड)