येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातिनिहाय जनगणना करणे ,ओबीसींचे न्यायालयाने रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्वरत ठेवणे, संपूर्ण देशातओबीसी घटकांना२७ टक्के आरक्षण देणे ,पदोन्नती मध्ये सुद्धा ओबीसींचे आरक्षण लागू करणे, नॉन क्रिमिलियर ची मर्यादा ओबीसींसाठी वीस लाखापर्यंत वाढवून देणे,न्यायमूर्ती रोहिणी आयोग लागू करण्यापूर्वी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशा ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या आव्हानानुसार दिनांक २२ सप्टेंबर रोजी ओबीसींनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचे सूचनेनुसार राज्यभर ही आंदोलने करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय ओबीसी संसदीय समितीचे अध्यक्ष तसेच विविध वरिष्ठांना तहसीलदारांमार्फत देण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष ऍड ज्योतीताई ढोकणे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. माधुरीताई संजय राणे,काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष राजू घुटे, काँग्रेस पक्ष नेत्या सौ. स्वातीताई वाकेकर, ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश तायडे यांचेसह ओबीसींच्या विविध पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी ओबीसींच्या विविध समस्यांवर राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे कार्याध्यक्षा ॲड ज्योतीताई ढोकणे, प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राजू घुटे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष सौ. माधुरीताई राणे,ओबीसी आरक्षण समितीचे ओमप्रकाश तायडे यांनी प्रकाश टाकला. ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी सुद्धा केली. ह्यावेळी सौ.मीनाताई सातव,सौ. मनिषाताई बगाडे, सौ आशाताई रमेश ताडे, सौ प्रतिभाताई बोदडे,सौ.मंजुराताई इंगळे, सौ आरतीताई केदार ,तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, शिवसेना नेते वासुदेवराव क्षिरसागर, नगरसेवक ऍड.संदीप मानकर,शाम देशमुख,काँग्रेस सेवादलाचे अन्सार बाबू, संजय इंगळें,बाळू मानकर,संतोष वानखेडे,शंकर मस्के,गजानन मानकर,रघुनाथ बोदडे, नितीन जाधव,सुभाष बोंबटकर,यांच्या सह शेकडो ओबीसी बांधवांची ह्यावेळी उपस्थिती होती.आपल्या मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा ह्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षा ऍड.ज्योतिताई ढोकने आणि सौ.माधुरीताई राणे यांनी ह्या वेळी दिला.आंदोलनात सहभागी सर्व ओबीसी बंधू,भगिनींचे प्रदेश उपाध्यक्षा सौ.माधुरीताई राणे यांनी आभार मानले.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ओबीसींचे निदर्शने---
जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-
