राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी येथील वैष्णोदेवी भक्त ललित जोशी व अशोक भागवत यांनी बुधवारी मेळघाट तें वैष्णोदेवी प्रवासाला सायकल ने प्रारंभ केला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा त्यांनी सायकलने प्रवासाला सुरवात केली आहे. सर्वप्रथम अशोक भागवत यांनी सायकलने वैष्णो देवी प्रवास केला होता. व ललित जोशी यांनी धारणी तें अहमदाबाद प्रवास सायकल ने केला होता त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदण होत आहे. त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी धारणीतूनवैष्णो देवी भक्तांचा मोठा जनसमुदाय जमा होता सर्वांनी त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. 'चलो बुलावा आया हैं माता ने बुलाया हैं, प्रेम से बोलो जय मातादी अश्या घोषणा दिल्या.तें 1800 की मी. चा प्रवास करणार आहेत.ललित जोशी व अशोक भागवत हे धारणी शहरातील यशस्वी व्यावसायिक व योगगुरू प्रसिद्ध समाजसेवक आहेत.देशातील प्रमुख समस्या बेटी बचाव बेटी पढाव, जंगल बचाव, मेक इन इंडिया, असे विविध विषयावर जनजागृती करत यांनी यात्रेला सुरवात केली आहे धारणी वरन प्रवासाला प्रारंभ करून खंडवा इंदोर देवा माक्षी गजियापूर, ग्वालियर मथुरा, आग्रा दिल्ली, कुरुक्षेत्र तें जम्मू काश्मीर असा 1800 कि.मी. चा प्रवास असणार आहे.सदर सायकल प्रवास तें वीस दिवसात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी संगितले आहे.ललित जोशी हे 66 वर्षाचे तरुण असून अशोक भागवत हे 61 वर्षाचे आहेत.नवयुकासाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी असून एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची दिनचर्या असून तें नवयुवकांसाठी आदर्श आहेत.या वयात सायकल ने एवढ्या लांब प्रवास करत असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
