सातपुडा कॉन्व्हेंट च्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड--


 जळगाव(जामोद)प्रतिनिधी:- 

शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या सातपुडा शिक्षण संस्थे अंतर्गत च्या सातपुडा स्कूल ऑफ स्कॉलर ह्या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी मधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे निवड झाली आहे. ह्या शाळेचे स्पंदन संदीप वाकेकर आणि अमित ज्ञानेश्वर येनकर यांची नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. नवोदय विद्यालय प्रवेश समितीने दोन महिन्यापूर्वी ह्या संदर्भात परीक्षा घेतली असून तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. स्थानिक सातपुडा कॉन्व्हेंट ही शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून दरवर्षी ह्या शाळांचे दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल शतप्रतिशत म्हणजे शंभर टक्के असतात. स्पंदन वाकेकर आणि अमित येनकर यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.सौ. स्वाती वाकेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक नितीन सातव,कॉन्व्हेंट चे कार्याध्यक्ष डॉ. संदीप वाकेकर आणि प्राचार्य संतोष बकाल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .स्पंदन वाकेकर याचे वडील व शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. संदीप वाकेकर हेसुद्धा नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

-----------

Previous Post Next Post