महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची शासकीय स्तरावरील योजने पासून वंचित, प्रलंबित कामे जलद गतीने व्हावी या उद्देशानं जिल्हाधिकारी अमरावती तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार माया माने यांच्या आदेशानुसार गुरुवारी ३० सप्टेंबर २०२१ रोजी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजनेतील अपंग योजना, विधवा योजना, श्रावणबाळ योजना, रेशन कार्ड नवीन व दुय्यम, आधार कार्ड दुरुस्त अशा विविध योजनेचे अर्ज प्राप्त करून घेण्याकरिता महाराजस्व अभियान आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५ श्रावणबाळ व संजय गांधी अपंग, ६५ जात प्रमाणपत्र, १२ आधार कार्ड दुरुस्तचे, १५ प्रतिज्ञापत्र (लेख), ४३ रेशन कार्ड दुय्यम, २२ नवीन रेशनकार्ड अशा विविध योजनेतील एकूण १७२ अर्ज घेण्यात आले. तसेच त्यांचे वाटप काही लाभार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी श्री.जी. ई. राजगडे नायब तहसीलदार,श्री. बाळासाहेब ढोके ग्रामसेवक, श्री.रामोद मोरले सरपंच, श्री.प्रताप धुर्वे महसूल सहाय्यक, श्री.ए. सी. ठाकूर महसूल सहाय्यक, श्री.शिवम लोखंडे कर्मचारी पुरवठा विभाग, श्री.प्रशांत हिरे तलाठी गांगरखेडा, श्री.शुभम ठाकरे तलाठी काटकुंभ,श्री. एम. पी येवले तलाठी चुरणी, श्री.प्रकाश मावस्कर तलाठी डोमा,श्री. एम . एन तांडील तलाठी जारीदा, तसेच विलास एम घुमावरे केंद्र चालक ग्रा. प. कोरडा, आलोक अलोकर सेतू संचालक चुरणी, राजेश एन. गाठे केंद्र चालक ग्रा.प. गांगरखेडा, धनराज आठोले केंद्र चालक ग्रा.प. कोयलारी, दीपक जी. आठोले केंद्र चालक ग्रा. प.रुईपठार यांच्या सह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थितीत होते.
गांगरखेडा येथे महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियान संपन्न...
राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी
