नांदुरा शहरातील शिवाजीनगर येथील हनुमान मंदिर परिसरात घरात शहरातील गटारीचे पाणी शिरत असते अक्षरशा गटारी चे सर्व पाणी घरात शिरल्यानंतर घाणेरडा वास आणि मच्छरांच्या वावरामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच नांदुरा शहरातील आठवडी बाजार ते सिंधी कॉलनी रोडवरील मास विक्री हटवून घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नांदुरा नगर परिषद सि ओ साहेब यांना निवेदन देण्यात आले येणाऱ्या काळात नवरात्र दशहरा दिवाळी या हिंदूंच्या सणांना सुरुवात होत असून अशा प्रसन्न वातावरणात शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून आपण योग्य ती कारवाई करून आठवडी बाजार ते सिंधी कॉलनी रोड घाणीच्या साम्राज्यात पासून मुक्त करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आठ दिवसानंतर तहसील कार्यालय समोर लक्षणीय अमरण उपोषण छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे निवेदन देतांना तालुका अध्यक्ष भागवत उगले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, उपाध्यक्ष राजू काळे शहराध्यक्ष सागर जगदाळे, शहर संघटक विशाल बग्गन, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे शहर उपाध्यक्ष संतोष सोनवाल ,दुर्गेश बारगजे , अजय बेलोकार, प्रवीण माळी, सोपान फाटे, विठ्ठल निंबाळकर, सचिन तायडे,ऋषिकेश सावदेकर, रतन डोंगरदिवे यांच्या सह्या आहेत.
घाणीचे साम्राज्य मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आले निवेदन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
