लोणवाडी येथील सर्व ग्रामस्थ तसेच महीला मंडळ व विश्व हिंदु परिषद बजरग दल कार्यकर्ते यांच्या द्वारे पोलिस स्टेशन येथील ठाणेदार साहेब व तहसीलदार साहेब नांदुरा यांना गावातील प्रताडीत नागरीक व महीला मंडळच्या 170 हून अधिक सह्या जमा करून निवेदन देण्यात आले की, मौजे लोणवाडी येथे होत असलेल्या अवैध दारू व मद्य विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यांचे सामाजिक स्वास्थ व आर्थिक नियोजन बिघडत आहे.गावातील महीला व लहान मुले यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेकांचे संसार उघड्यावर झालेले आहेत.अनेकांचे जिवन उध्दवस्त झालेले आहेत.लोणवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनास प्रतिसाद देऊन लोणवाडी गावातील अवैध सुरू असलेली दारू बंद करावी अन्यथा सर्व गावकरी तसेच महीला मंडळ व विश्व हिंदु परिषद बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल... त्यावेळी विश्व हिंदु परिषदेचे गजानन भाऊ कु-हाडे, बजरंग दलाचे सुशील भाऊ कोल्हे, लोणवाडी येथील अतुल बोरसे, श्रीराम चिमकर, राहुल चव्हाण, अवि गवळी, सागर जंगले, संदिप वानखडे, प्रतीक सोळंके, दत्ता उमरकर या सोबत असंख्य लोणवाडी नागरीक व बजरंगी कार्यकर्ते उपस्थित होते...
लोणवाडी गाव दारूमुक्तीसाठी देण्यात आले निवेदन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
