जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक १७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या समोरील ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या हॉलमध्ये सोसायटीची आमसभा संपन्न झाली. या सभेमध्ये एकूण पाच सदस्यांची सुनगाव ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणा विजय शत्रुघ्न वंडाळे यांची निवड करण्यात आली. यांच्या नावाची सूचना गणेश रामकृष्ण धुर्डे यांनी केली तर अनुमोदन सुनील धर्मे यांनी केले. तसेच खरेदी विक्री संस्था जळगाव जामोद च्या सदस्यपदी गजानन लक्ष्मण कपले यांची निवड करण्यात आली यांना सुचक पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे तर अनुमोदक सरपंच रामेश्वर अंबडकार, जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्था जळगाव जामोद च्या सदस्यपदी डॉक्टर शालिग्राम कपले यांची निवड करण्यात आली. यांना सुचक माजी सरपंच पुंडलिक पाटील तर अनुमोदक शेषराव वंडाळे, यासह जिल्हा देखरेख सहकारी संस्था बुलढाणा सदस्यपदी सुरेश रामा काळपांडे यांची निवड करण्यात आली यांना सुचक गुणवंता काळपांडे तर अनुमोदक ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे यासह जिल्हा सहकारी बोर्ड बुलढाणा च्या सदस्यपदी पांडुरंग सखाराम धुळे यांची निवड करण्यात आली यांना सुचक चंद्रभान गवई तर अनुमोदक पांडुरंग सूर्यभान इंगळे हे होते. या सर्व सदस्यांची निवड सभेमध्ये अविरोध करण्यात आल्यामुळे यामध्ये कोणाचीही नाराजी झाली नाही. या निवडीबद्दल उपस्थितांनी सर्व पाच ही सदस्यांना निवडीच्या शुभेच्छा दिल्या. या आमसभेला सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, माजी सरपंच पुंडलिक पाटील, शेषराव वंडाळे, दिनेश ढगे, बळीराम वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, कृषीमित्र मोहनसिंह राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, पांडुरंग इंगळे,रमेश गवई चंद्रभान गवई,गुणवत्ता काळपांडे,सुनील धर्मे,गुणवंत कपले,सुरेश बोबडे,रवि धुळे यांच्यासह सुनगाव येथील शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. आमसभा शांततेच्या वातावरणात संपन्न झाली.
सुनगाव येथून ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यपदी पाच जणांची अविरोध निवड...
जळगांव जामोद.ता.प्रतिनिधी:-