आकोट तालुक्यातील ग्राम रुईखेड येथील मंगेश निंबोळकार मित्र परीवार यांच्या वतीने गुरूवार दि. १६ सप्टेंबर ला येथील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भव्य शिबीरात एकुण ३०जनांनी रक्तदान केले तसेच शिबिरामध्ये तरुण मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले आयोजक पत्रकार मंगेश निंबोळकार तर कार्यक्रमाचे नियोजन ऋषिकेश झापे यांनी केले,या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे आशीष झापे, गोपाल ठोसर, सुधीर मेतकर, निलेश कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख शाम गावंडे, सुशील टोलमारे, पवन मेतकर, सागर सपकाळ निवृत्ती सदार श्रीकांत गावंडे व तसेच श्री छत्रपती प्रतिष्ठान अकोला संस्थापक विपुल माने व साई जीवन रक्तपेढी चे संक्रमण अधिकारी गुजलवार सर,पंकज सर, ऋषी कसर ,हर्ष मॅडम यांनी काम पाहिले रक्तदान शिबिराला तरुणवर्गासह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमाचा शेवटी अायाेजक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मंगेश निंबोळकार यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान...
राजु भास्करे /अकोला जिल्हा प्रतिनिधी