दिनांक २४ सप्टेंबर रोजी जळगांव जामोद शहरातील काही शाळा व सभागृहाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला. शहरातील शाळा व सभागृह लोकार्पण सोहळ्यामध्ये अनुपस्थित राहून महाविकास आघाडी तर्फे या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार व निषेध नोदविण्यात आला होता. सदर महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला.त्यात प्रगटेश्वर शाळा क्रमांक २ येथे दरवाज्यांच्या चौकटी अव्यवस्थित असून वेगवेगळ्या तुकडे लावून तयार केलेल्या आहेत तसेच संबंधित ठेकेदाराने शाळा इमारती चे बांधकाम मध्ये हलगर्जीपणा व न प अभियंता यांच्या दुर्लक्षितपणाने इमारत वाकलेली असण्याची शक्यता आहे.छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक ३ येथे विद्यार्थी स्वच्छता गृहाचे काम अधुरे आहे,रूपलाल महाराज शाळा क्रमांक १ च्या इमारत मध्ये पायाभरणी करतांना जुने मटेरियल वापरले आहे.ह्या व अश्या अनेक समस्या सह ह्या वास्तूंचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून निकृष्ट दर्जाचे आहे, परंतु येत्या नगर परिषद च्या निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपा शासित न प प्रशासनाने घाईगडबडीत लोकार्पण सोहळा उरकला वास्तविक पाहता जळगाव जामोद शहरात समस्यांचा डोंगर उभा असून सत्ताधारी फक्त अपूर्ण कामांचे लोकार्पण करून स्वतःची वाहवाह करण्यात मग्न आहे. ह्या बाबतीत महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप,शिवसेना गटनेते गजानन वाघ,नगरसेवक श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे,ऍड संदीप मानकर,तसेच बाळूभाऊ इंगळे,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल जहीर यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नगर परिषदेने केलेल्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम व त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार उघड्यावर आणण्यात येईल तसेच कोट्यवधी रकमेचा बट्ट्याबोळ सत्ताधारी भाजपाच्या न प प्रशासन कडून झाला असतांना विकास कामाचा खोटा आव आणल्या जात आहे.ह्या सर्व बाबींविषयी महाविकास आघाडीतर्फे नगर विकास प्रशासन कडे तक्रार करून चौकशी करण्यात येईल व हुकूमशाही पद्धतीने काम करत असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात येईल असे सूतोवाच करण्यात आले.
महाविकास आघाडीचा नगरपरिषद प्रशासनाने आयोजित केलेल्या लोकार्पण सोहळावर बहिष्कार...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
