राजु भास्करे /चिखलदरा
मेळघाटात सर्दी, खोकला व ताप यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मेळघाटात सर्दी खोखला तापाचा प्रमाण जास्त होत असल्याने येथिल रुग्णांना पैसे साठी धावपळ करावी लागत आहे. मेळघाटातील आरोग्य विभागाने या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच लहान बच्चू पण या बिमारीने ग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे.या सर्व बाबी कडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे समजले जाते.तसेच सतत पाउस सुरु असल्याने आदिवासी बांधवांची शेती नष्ट होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना पैसे साठी भटकंती करावी लागत आहे.त्याकरिता शासनाने या गोष्टी कडे लक्ष देवून काहीतरी उपाय योजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.
