जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक 22 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे आदिवासी भागांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमांमध्ये सदर कार्यक्रमांमध्ये आदिवासी भागांमध्ये पोषण अभियान अंतर्गत आहार प्रदर्शन किशोरी मार्गदर्शन गरोदर महिलांना फळवाटप व आहार आरोग्य बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता वानखेडे यांनी आहाराविषयी सखोल मार्गदर्शन केले या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना जळगाव जामोद अंतर्गत किशोरी मुली रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच गरोदर महिलाना आहारामध्ये फळे व विषमुक्त अन्न याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमामध्ये निमखेड येथील आशा सेविका,मदतनीस तसेच हेलापाणी येथील आशा सेविका व मदतनीस तसेच तालुका गटसमन्वयक तसेच गावातील किशोरी मुली महिला तसेच गरोदर महिला यावेळी उपस्थित होत्या.
