शरीरा करिता खेळ हा सर्वात चांगला व्यायाम आहे. तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण व्हावी याकरिता जळगाव जामोद येथे दिनांक 24 सप्टेंबर रोजी एम्स क्रिकेट ॲकॅडमी आणि सुशील जयस्वाल सर,महादेव माठे सर,संजय पलन सर यांच्या प्रयत्नांने छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलापर्यंत खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून तरुणांना क्रिकेट बैटचे वाटप करण्यात आले. दिनांक 26 सप्टेंबर पासून प्रथम नगराध्यक्ष मोतीलाल जी जयस्वाल यांच्या समृति प्रीत्यर्थ जळगाव जामोद शहरामध्ये क्रिकेटचे सामने सुरू होत आहे त्यानिमित्त एम्स क्रिकेट ॲकॅडमी आणि सुशील जयसवाल सर,महादेव माठे सर, संजय पलन सर यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना क्रिकेट बँटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या छोट्या खाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशील जयस्वाल सर होते प्रमुख उपस्थिती महादेव माठे सर, संजय पलन सर , समाजवादी चे जिल्हाध्यक्ष अजहर खान,आर सी २४ न्युजचे संपादक राजेश बाठे, ऐम्स क्रिकेट अकादमी संचालक जफर खान अमानुल्लाह खान सर यांची उपस्थिती होती.सदर या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जफर खान सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानून तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण करण्याकरिता त्यांना क्रीडा क्षेत्राची गरज का आहे तसेच खेळाबरोबर आपल्याला शिक्षणही किती महत्त्वाचे आहे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महादेव माठे सर यांनी सुद्धा तरुणाला योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला क्रितेश अग्रवाल,साद अर्शद खान,सोहम वराडे,साहिल भाले,निखिल खंडारे,आकाश भुते,आयुष राऊत, रोहित निमकर्डे,प्रभुद इंगळे,प्रणव चोपडे, रोशन बोदडे,हर्ष पलन,लवकेश पांडव, गौरव बैरागी, सहिल राउत यांची यावेळी उपस्थिती होती.
तरुणांना क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त रुची निर्माण व्हावी याकरिता क्रिकेट बैट वाटप...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
