पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस यानिमित्त पिंपळगाव काळे भाजपाकडून भव्य तयारी करण्यात आली आहे. मोदींचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपनं २० दिवसांच्या राष्ट्रव्यापी अभियानाची योजना आखली आहे. या अभियानाला आज पासून सुरुवात केली जाणार असून ७ ऑक्टोंबर रोजी याची सांगता होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अभियानाला सेवा आणि समर्पणाच नाव देण्यात आला आहे. तीच सेवा म्हणून आज पिंपळगाव काळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा यानिमित्त पिंपळगाव काळे येथे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. भारतीय जनता पार्टी किसान आघाडी. भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी. या सर्वांकडून दवाखान्यामधील रुग्णांना फळ वाटप व अल्पोहार वाटप करण्यात आला. यावेळी. भाजपा कार्यकर्ते. ग्रामपंचायत सदस्य. भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी. गावातील नागरिक तसेच डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते.