दिल्ली येथील घटनेचा समाजवादी पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने निवेदन देत करण्यात आला निषेध..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

समाजवादी पार्टी जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना दिल्ली येथील पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी देण्यात आले निवेदन. दिल्ली संगम विहार स्थित महिला पोलीस कर्मचारी राबीया सैफी यांच्या सोबत दुष्कर्म करून त्यांची निर्घुन हत्या करण्यात आली. जाहीर निषेध व्यक्त केला. या अगोदर निर्भया मनिषा प्रकरण देशात घडले आहे यापुढे असा कोणताही प्रकार घडु नये याकरीता राबीया सैफी यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी की जेणे करून भविष्यामध्ये असा प्रकार घडल्या जाणार नाही.दिल्ली पोलिस विभागातील कार्यरत महिला पोलिस कर्मचारी यांच्या मारेकऱ्यांना व बलात्काऱ्यांविरुद्ध जलद गतीने प्रकरण कोर्टात चालविण्यात येवुन त्यांना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी समाजवादी पार्टिच्या वतीने करण्यात आली.तसेच  ला न्याय न मिळाल्यास समाजवादी पार्टिच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच तिच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत. जर देशातील पोलीसच सुरक्षीत नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? महिला ही कोणत्याही जाती धर्माची असो ती या देशाची कन्या आहे. अश्या घटना देशात पुन्हा घडु नयेत. म्हणुन कठोर पाऊले केंद्र सरकारने उचलावीत व कडक कायद्याची अमलबजावणी करावी. अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना जळगाव शहराध्यक्ष सय्यद नफीस. जिल्हाध्यक्ष, आजहरउल्ला खान. जिल्हा महासचिव लियाकत खान. तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार. मनोज ठाकूर, रिजवान खान ,ए आर साबिर ,अल्ताफ .सै कमर,तवसिफ,अतर ,यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post