वरुर जऊळका येथे योग योगेश्वर संस्थान मध्ये समर्थ सद्गुरु गजानन महाराज संजीवन समाधी सोहळा च्या निमित्य अर्थात ऋषी पंचमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्री रतन पाटील वानखेडे यांच्या हस्ते तीर्थ स्थापना करण्यात आले व गजानन विजय ग्रंथाचे पारायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व्यासपीठावर पारायण प्रवक्ते ह भ प श्री रामदास महाराज जंजाळ व वैभव महाराज वसु लाभलेले असून सप्ताहातील प्रथम दिवसाचे कीर्तन रुपी वाकपुष्प ह भ प श्री भानुदास महाराज टाकळीकर यांनी श्री च्या चरणी समर्पित केले यावेळी सप्ताहाच्या पहिल्या दिवसाला दुग्धशर्करा योग संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा असल्यामुळे कीर्तनकार महाराजांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कीर्तनामध्ये महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व पटवून सांगत असताना संत सेना महाराज चरित्र व समर्थ सद्गुरु गजानन महाराज चरित्र आवर्जून भाविकांना सांगितले नामस्मरणाचे महत्त्व सांगत असताना महाराज म्हणाले तुमच्यावर कितीही संकट आले तर श्रद्धेने समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचे नामस्मरण करा हे संकट समर्थ सद्गुरु गजानन महाराज निवारण केल्याशिवाय राहणार नाहीत याकरिता गजानन चरित्रातील बंकटलाल, भास्कर पाटील ,जानराव देशमुख अशा बऱ्याच संतांचे दाखले सुद्धा देण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या श्रद्धेने कीर्तना करिता उपस्थित असून परिसरातील गायक-वादक गुणीजन मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली अशी माहिती योग योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे यांनी दिली कीर्तनाच्या साथीला ह भ प मनोहर पाटील मोहकार,काळे महाराज, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे, विलास महाराज कराळ, गजानन मोडक ही गुणीजन मंडळी उपस्थित होती
गजानन महाराजांच्या नामस्मरणाने संकट टळते - भानुदास महाराज टाकळीकर...
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.