राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी तालुक्यातील सालाई येथे काल दुपारी दीड वाजेच्या दरम्यान वीज पडून सालाई येथील युवक अजय हरिचंद धांडे या युवकाचा मृत्यू झाला.शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह पावसाला सुरवात झाल्याने मेघगर्जना होत असताना अचानक वीज कोसळून सालाई येथील युवक अजय हरिश्चन्द्र धांडे शेताकडे तलावाच्या काठी असताना हा युवक गंभीर झाल्याने त्याला तात्काळ उपचारसाठी नेताना अत्यंवस्थ झाल्याने त्याचा मृत्यू झाला.