फॉरेस्ट, डिपारमेंट, मेळघाटात,झिलांगपाटी, वर्तुळात, आर एफ ओ, वनपाल, चाळीस हजारासाठी पशुधन, व आदिवासी नागरिकांना केली मारझोड मेळघाटातील आदिवासी बहुल भागा मध्ये राहणाऱ्या आदिवासी नागरिकांवर, शेतकरी शेतमजूरावर, रोजच इंग्रज साई पद्धतीने अत्याचार अन्याय होत असताना आपण आहोत,असाच एक प्रकार फॉरेस्ट डिपार्टमेंट धारणी पासून जवळच असलेल्या झिलांगपाटी, वर्तुळात (खडकी) मोगरदा, येथे अन्याय कारक घटना उघडकीस आली आहे, दिनांक, १०/९/२१ रोजी, या भागातील आदिवासी बांधव, आपले पशुधन, बैल व गाई, चराई, साठी, घेऊन गेले असता, खडकी, झिलांगपाटी, येथील वनपाल, सोनकुमार,, आर एफ ओ, बी एन बकाल, यांनी, या आदिवासी शेतमजूर शेतकऱ्यांना पकडून अमानुषपणे महारण करत पशुधन बैलांना व गाईंना सुद्धा मारझोड करण्यात आली यांनी माणुसकीला काळीमा फासत गुरांना व नागरिकांना रात्रीचे तीन वाजे पर्यंत इंग्रज शाही पद्धतीने दंडुकेशाही पद्धतीने वागणूक दिल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष व जेश विदर्भ उपाध्यक्ष श्री संदीप तोटे, येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे रात्रीच्या वेळी, आर एफ ओ व वनपाल यांनी चाळीस हजार रुपये घेऊन, या लोकांना रात्रीच जंगलात सोडून दिल्याचे माहिती समोर आली आहे नागरिकांना मारझोड गुराढोरांना, सोडविण्याची विनंती उपविभागीय अधिकारी, वैभव वाघमारे धारणी, यांनी फोनवरून वनविभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून मुक्तता केल्याची माहिती समजली मेळघाटामध्ये अशाच पद्धतीने प्रत्येक वर्तुळात,वनविभागाकडून, अत्याचार अन्याय होत असतील तर आदिवासी चा वाली कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे
आर,एफ,ओ व वनपाल यांनी 40000 रूपयांसाठी पशुधन व आदिवासी कुटुंबांना केली मारहाण...
राजु भास्करे / चिखलदरा