७ वर्षीय बालीकेवर अत्याचार....


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

रहीमापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या गावातील तरुणाने ७ वर्षीय बालीकेवर लैंगीक अत्याचार केल्याच्या घटनेने दर्यापुर तालुक्यासह अंजनगाव तालुक्यातही खळबळ माजली.प्राप्त माहीतीनुसार पोटाची खळगी भरण्याकरीता आई वडील आजी आजोबाकडे ७ वर्षीय चिमुरडीस सोडुन शेतात मजुरी करीता गेले होते. पिडीत बालीका लेंडी नाल्याच्या बाजुने शौचास गेली असता २० वर्षीय नराधम शिवम प्रदिप पातोंड हा दुचाकीवरुन शेतात जात होता. आपण गवताला शेतात जाऊ असे सांगुन दुचाकीवर बालीकेस बसवुन शेतात नेले असता कापुस पिकाच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली दुष्कर्म केले.आई वडील घरी आले असता पिडीत बालीका रडत असल्याचे दिसल्याने चौकशीअंती माहीत झाल्याने पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भादवि ३६३, ३६६, ३७६ अ ब लैंगीक बाल अत्याचार प्रतिबंधक सरक्षण अधिनियम २०१२ अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये घटनास्थळाचा पंचनामा करुन रात्री ३ वा. गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव यांच्या मार्गदर्शनात सुरु असुन नराधमास अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Previous Post Next Post