गणपती निमित्त संपूर्ण शहरात शांततामय वातावरण निर्माण व्हावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता लोणार पोलिस स्टेशनच्या वतीने आज लोणार शहरात शहरातील मुख्य चौकात पोलिसांच्या वतीने तसेच दंगा काबू पथक बुलढाणा पोलीस फोर्स यांच्या वतीने संपूर्ण शहरात रॅपिड करण्यात आली व विनायक चौकात शक्ती प्रदर्शन कवायत करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया जिल्हा पोलीस उप अधीक्षक बजरंग बंनसोडे उपविभागीय अधिकारी विलास यमावार यांनी कोरोना प्रदुरभाव लक्षात घेता सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढू व सर्व नियम व अटी लक्षात घेऊन शांततेत गणेश विसर्जन करावे असे आवाहनही केले लोणार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक शरद आहेर भारत बोर्डे सुरज काळे लेखनिक चंद्रशेखर मुरकर गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण विठ्ठल चव्हाण बीट जमादार राम गीते व इतरही कर्मचारी यावेळी हजर होते.
पोलीस फोर्स लोणार शहरात शक्तिप्रदर्शन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर...
संदीप मापारी पाटील:-बुलढाणा