जळगाव जामोद येथील पोलिस स्टेशनला पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर रुजू होताच त्यांनी संपूर्ण शहरात दुचाकी तपासणी धडक मोहीम हाती घेतली. तसेच त्यांनी या मोहिमेअंतर्गत गेल्या आठ दिवसात ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई करून त्यांची कागदपत्रे तपासली.अशातच ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामोद पोलीस चौकीचे उमेश शेगोकार यांनी अशीच एक धडक कारवाई करून जामोद येथून दोन आरोपी सह सात होंडा शाईन गाड्या जप्त केल्या. दोन आरोपीसह सात होंडा शाईन गाड्या जप्त केल्या असल्या तरी वाहन तस्करीच हे मोठं रॅकेट सक्रिय असण्याची दाट शक्यता असून ह्यामध्ये अजून आरोपी आणि चोरीच्या मोटरसायकली वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यात अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.उमेश शेंगोकर आणि सहकाऱ्यांनी दिनांक ११ सप्टेंबर रोजी जामोद येथील मोहन भास्कर गोरे आणि रमेश प्रल्हाद शिंदे यांच्याकडून संशयास्पद रित्या त्यांनी दोन होंडा शाईन मोटरसायकल संशयास्पद जप्त केल्या. गाडीच्या कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडी व त्यांना ताब्यात घेतल्यावर सदर गाडीच्या चेचिस वरील नंबर त्यांनी खोडून टाकल्याचे सांगितले.आरोपींना दिनांक ११ सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर केले असता त्यांना तीन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आला. पोलिस कस्टडी रिमांड मध्ये ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून अधिक पाच होंडा शाईन मोटर सायकली (किंमत २,८०,०००/-) रुपयाच्या ताब्यात घेण्यात आल्या. त्यांच्याकडून एकूण सात मोटर सायकल दिनांक १३ सप्टेंबर दुपारपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ह्यामुळे ह्या मोहिमेअंतर्गत दोन आरोपींसह सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. मोटर सायकल चोरी करणाऱ्यांचे हे फार मोठे रॅकेट असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर म्हणाले.-------------------------------------------------------
जामोद आणि परिसरात मोटरसायकल चोरीचे अजून रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया उपविभागीय पोलिस अधिकारी हेमराजसीह राजपूत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील अंबुलकर , पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे ,पोलीस कॉन्स्टेबल संजय राऊत पोलीस नाईक उमेश शेगोकार,भागवत उबरहंडे ,पोलीस शिपाई संदूके,नंदकिशोर दाते,श्रीराम वसतकार,सचिन राजपूत यांनी सक्रिय सहभाग घेतला.
---------------------------------------------------------