दिनांक. 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात ते साडे सात च्या सुमारास जळगाव जामोद संग्रामपूर रोड वर असलेल्या कृषी विज्ञान केंद्रा जवळ एका दुचाकीचा अपघात होऊन त्यामध्ये दोन इसम गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनास्थळी कोणीच नव्हते परंतु रस्त्यावरून गावा नजीक नागरिक जात असताना दोन व्यक्ती व टू व्हीलर गाडी बे अवस्थेत पडलेले दिसून आले. अपघात घडला त्या ठिकाणाहून जात असलेल्या काही नागरिकांनी घटनास्थळावर थांबून दुखापत झालेल्या व्यक्तींना विचारपूस केली सदर व्यक्ती निंभोरा या गावचे गजानन सनानते व नंदू हमकार हे असून .घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी क्षणाचा ही विलंब न करता 108 या क्रमांकावर फोन करून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहिनीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात होते. तेथे जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे. सदर व्यक्तींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहेत.
जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्र जवळ दुचाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातातील जखमींवर खामगाव येथे उपचार सुरू...
जळगांव जा.प्रतिनिधी:-