अकोट तालुक्यातील मौजे बोर्डी आणी लाडेगावचे कृषी सहायक ईश्वर बैरागी आणि गंगाधर इंगोले यांची बदली झाल्याचे समजताच बोर्डी सह परीसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या भव्य नागरी सत्कार ग्रामपंचायत बोर्डी आणी परिसरातील शेतकऱ्यांनी केला कर्तव्य दक्ष कृषी सहाय्यक श्री इंगोले साहेब आणी बैरागी साहेब यांची बदली झाल्यानिमित्त त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना निरोप देण्यात आला. इंगोले आणि बैरागी साहेब हे बोर्डी आणी लाडेगावतील शेतकऱ्यांचे कृषिसहायक कमी आणी मित्र जास्त होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत बोर्डी चे माजी सरपंच श्री सुभाष खिरकर .प्रमुख उपस्थित उपसरपंच राजेश भालतिलक तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब ताडे. ग्रामसेवक मोहोकार साहेब खामकर साहेब .सुनील लाहोरे .पुरुशोत्तम चेडे .विष्णू पखाले .हरी वानकर.समाधान चंदन,नंदलाल राय, रवीन्द्र ताडे.कपिल रजाने.नितिन लटकुटे.विनोद गये.सुभाष तळोकार.मो साजिद.गजानन डवंगे.गोकुळ लटकुटे.प्रभाकर घोडकी ,संतोष राय.किशोर काळे,चेतन गुरेकार. दिनु ताडे,धनराज धर्मे.राजु वाघमारे.योगेश कडु.अक्शय वरणकार.आदीच्या संखेने उपस्थित होते.
लाडेगाव आणि बोर्डी च्या कृषी सहाय्यक यांना बोर्डी ग्रामपंचायत च्या वतीने निरोप समारंभ.चांगल्या कामांची घेतली दखल...
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.