पिकविम्याचा संघर्ष पेटला.आ डॉ संजय कुटे यांचे मंत्रालयात आंदोलन सुरु...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील पीक विमा संदर्भात दिनांक 1 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री यांच्या दालनात झालेल्या बैठकीत 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी बांधवाना पीकविमा वितरित न केल्यास पुढील आंदोलन करण्यात येईल असा ईशारा आ डॉ संजय कुटे यांनी दिला होता. त्यानुसार काल पर्यंत शासन किंवा रिलायंन्स विमा कंपनी कडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आ डॉ संजय कुटे यांनी आज आक्रमक रूप धारण केले. सकाळी 11 वाजता आपल्या निवडक शेतकरी बांधवसह गोरेगाव येथील रिलायंस कंपनी चे कार्यालय गाठून तेथील उपस्थित जबाबदार अधिकारी ना जाब विचारला. अतिशय आक्रमक झालेल्या चर्चेतून त्याठिकाणी कंपनी कोणत्याही निर्णयाप्रत पोहचेल असे दिसत नसल्याने आ डॉ कुटे चांगलेच संतप्त झाले. एकीकडॆ शासन हे विमा कंपनीकडे अंगुलीनिर्देश करते तर दुसरीकडे विमा कंपनी ही शासनाने पैसे न दिल्याने आम्ही असमर्थ आहोत असा अंगुलीनिर्देश शासनाकडे करते आहे, यामध्ये गरीब शेतकरी बांधवांचे मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्या मुळे आ डॉ कुटे यांनी दुपारी 3 वाजता थेट मंत्रालय गाठत आपले आंदोलन मंत्रालयाच्या आवारात सुरू केले आहे. जो पर्यंत शासन पीकविमा या शेतकरी हिताच्या प्रश्ना संबंधी योग्य निर्णय घेत नाही तो पर्यंत मी या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका घेत आपले आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार विजयराज शिंदे,जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, तालुकाध्यक्ष लोकेश राठी, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष शिव ठाकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, गजानन सरोदे, राजेंद्र ठाकरे, जानराव देशमुख,भारत वाघ, रामदास म्हसाळ, सुधाकर शेजोळे,शोएब उपस्थित होते

Previous Post Next Post