जळगाव जामोद येथील बीएसएनएलचे दूरसंचार कार्यालय आहे या कार्यालयामध्ये एप्रिल पासून कोणी मोठा अधिकारी नाही त्यातच ऑफिस मध्ये तीन कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना गेल्या सहा महिन्यापासून वेतन नसल्यामुळे जळगाव जामोद येथील ग्राहक सेवा केंद्र बंद असून जळगाव संग्रामपूर येथून दररोज किती ग्राहक बिल व चेक द्वारे बिल भरणा करण्याकरिता व इतर सुविधा करता येतात परंतु येथे ग्राहक सेवा केंद्रामध्ये कोणी नसल्यामुळे सदर ग्राहकाची असुविधा होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे वरवट जामोद सुनगाव आसलगाव पी काळे येथील दूरध्वनी केंद्रावरील फक्त बॅटरी दोन असून गेल्या एका वर्षापासून त्या बंद आहेत. या सुविधेमुळे ग्राहक कंटाळली असून तसेच जळगाव जामोद तालुक्यामध्ये नेहमीच ब्रॉडबँड लँडलाईन ह्या सेवा नेहमी विस्कळीत होत असतात तसेच याहो सुविधेबद्दल नांदुरा येथील मॅडम शी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होत नाही झाला तरी योग्य प्रतिसाद देत नाहीत बेजबाबदारपणे उत्तर देतात अनेक ग्राहकांना उद्धव शब्दात बोलतात तरी वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन कंत्राटी कामगारांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावून येथील सुविधा सुरळीत सुरू करण्यात यावी आजही अनेक ग्राहक बीएसएनएल ला मोठ्या प्रमाणात पसंत करतात या सर्व बाबींचा विचार करून जळगाव जामोद तालुक्यात ठिकाणी अधिकाऱ्याची नेमणूक करावी व ग्राहकांची होणारी असुविधा पूर्ववत सुरळीत करावी अशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी आहे.
जळगाव जामोद येथील बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र गेल्या पंधरा दिवसापासून बंद ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर...
जळगांव जा.प्रतिनिधी:-