महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी याकरिता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन...

 जळगांव जा.प्रतिनिधी:-

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे करिता केंद्र शासनाने स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी या मागणीसाठी दिनांक 16 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद च्या तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विदर्भ विभागीय अध्यक्ष अविनाश चव्हाण बुलढाणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल पाटील, विद्यार्थि तालुकाध्यक्ष सौरभ अवचार, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष अंकित दाभाडे,विठ्ठल जाणे, विद्यार्थी तालुका कोषाध्यक्ष वैभव गावंडे, विद्यार्थी तालुका सरचिटणीस अभिजित दाभाडे, गोपाल वासनकर, मोईन राज, सय्यद दानिश, प्रणव अवचार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post