ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन जळगाव जामोद च्या वतीने नमूद करण्यात आली की, दिल्ली संगम विहार स्थित महिला पोलीस कर्मचारी राबीया सैफी यांच्या सोबत दुष्कर्म करून त्यांची निर्घुन हत्या करण्यात आली. याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. या अगोदर निर्भया मनिषा प्रकरण देशात घडले आहे यापुढे असा कोणताही प्रकार घडु नये याकरीता राबीया सैफी यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी की जेणे करून भविष्यामध्ये असा प्रकार घडल्या जाणार नाही.दिल्ली पोलिस विभागातील कार्यरत महिला पोलिस कर्मचारी राबिया सैफी यांच्या मारेकर्याना व बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध जलद गतीने प्रकरण कोर्टात चालविण्यात यावे.तसेच राबीया सैफी च्या परिवाराला तात्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.महिला पोलीस कर्मचारी राबिया सैफी च्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत. जर देशातील पोलीसच सुरक्षीत नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? महिला ही कोणत्याही जाती धर्माची असो ती या देशाची कन्या असुन ती आमची माता आणि बहीण आहे. अश्या घटना देशात पुन्हा पुन्हा घडु नये. म्हणुन कठोर पाऊले उचलुण कठोर कायद्याची अमलबजावणी करावी.निवेदनात mim शहर अध्यक्ष समीर आर्यन महासचिव गूलाब शेख रशिद खान जावेद पटेल शेख महबूब शोएब खान मोहम्मद शहजाद व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दिल्ली पोलीस दलातील महीला पोलीस कर्मचारी हिच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.ए आय एम आय एम च्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन..
जळगांव जा.प्रतिनिधी:-