जळगांव जामोद तालुक्यासह जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळाने शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.या वादळाचा तडाखा जळगांव जामोद तालुक्याला 27,28 सप्टेंबर 2021 रोजी बसला आहे.यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, मक्का पिकाचे शंभर टक्के भरून न निघणारे नुकसान झाले असताना पुन्हा 6 ऑक्टोंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी महसूल मंडळात चक्रीवादळामुळे खूप मोठ्या प्रमानावर नुकसान झालेले आहे.पेरणीच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आधीच पिक व्हेंटिलेटवर असताना पिक काढणीच्या वेळी चक्रीवादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे नुकसान शंभर टक्के भरून निघणे कठीण आहे.त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50000/- पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेड चे अमोल दाभाडे, रुस्तम दाभाडे, दत्ता आटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50000-रुपये मदत द्या.संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी..
जळगांव जामोद प्रतिनिधी:-