जळगाव जामोद येथे दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी महाराजा श्री अग्रसेन जी यांची जयंती अग्रवाल समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री मंगलदास मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमामध्ये समाज बांधव व प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजा श्री अग्रेसन यांची जयंती चा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम महाराजा अग्रेसन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करून जयंती साजरी करण्यात आली. समता बंधुता व एकता या त्रिसूत्री धोरणावर समाज विविध लोकोपयोगी समाजकार्य करतात त्यांच्याच सिद्धांतावर शेगाव श्री अग्रेसन सहकारी पतसंस्था कार्यरत आहे संस्थेच्या वतीने सुध्दा महाराजा श्री अग्रेसन जी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बिहारीलाल जी अग्रवाल मंगलदास मोदी सुरेश मोदी, नवलकिशोर मोदी, नरेंद्र अग्रवाल,गोविंद अग्रवाल, रमेश मोदी, बुधमल अग्रवाल,संजय अग्रवाल, बन्सीलाल अग्रवाल, संजीव अग्रवाल, दिनेश अग्रवाल, मदनलाल अग्रवाल, कुंजबिहारी अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, दिनेश अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, लखन अग्रवाल,राजेंद्र अग्रवाल, कृष्णकुमार अग्रवाल, मुरालीलाल अग्रवाल,विजय अग्रवाल याच्यासह जळगाव जामोद नगरीच्या नगराध्यक्षा सीमा डोंबे,ओमप्रकाश राठी नंदकिशोर तायडे पत्रकार अभिमन्यू भगत डॉक्टर प्रकाश बगाडे तसेच कार्यक्रम यशस्वितेकरिता बहुसंख्य समाज बांधव व अग्रेसन पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाराजा अग्रेसन यांची 5145 वी जयंती उत्साहात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-