पिक विमा योजनेतून जलंब मंडळ वगळृन शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी आज दि.20 ऑक्टोबर रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयावर धडकून एसडीओंना निवेदन सादर केले आहेत. जलंब मंडळ सक॔लमधील सोयाबीन व इतर वानाची पेरणी झाली आहे या पिकांचा पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत विमा काढलेला आहेत. असे असतांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसह प्रशासनाने पिक विमा योजनेतून शेगाव तालुक्यातील जलंब महसूल मंडळाला वगळले आहे त्यामुळे अतिवृष्टीने पिकाचे अनोनात नुकसान झाले असतांना सुध्दा या पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या मंडळाचा पिक विमा योजनेत समावेश करण्यात यावा व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना धडकून निवेदन सादर केले. या वेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, यांची सुद्धा उपस्थिती होती. निवेदन देतेवेळी रामभाऊ धामणकर,महादेव सोनटक्के,संजयसिग राजपुत,उत्तमभाऊ घोपे,सतिशभाऊ सोनटक्के, विठ्ठल सोनटक्के, जितेंद्र राजपुत,प्रकाश मंडवाले,सुरेश शिवरामे ,रामदास काळे श्रीकृष्ण तांदुळकार,गोपाल मोहे,गणेश देवचे,प्रतापसिंग राजपुत,अरुणसिंग राजपुत,मनोहर बोडखे आदी शेतकरी उपस्थित होते .
पिक विमा योजनेतून जलंब मंडळ वगळले शेतकऱ्यांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुरज देशमुख.RC24 न्युज.