जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगांव जा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या असलेली जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन ची iso मानांकन प्राप्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल असून त्या साठी शाळेतील शिक्षकांनी समाजातील दान दात्यांना मदतीची हाक दिली होती.शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक आलेख चढता असल्याने सामाजातून मोठ्या प्रमाणात शाळेला मदत मिळत आहे. त्यानुसार दि.17 ऑक्टोबर रोजी समाधान भाऊ दामधर सरपंचपुत्र जामोद यांनी त्यांच्या वाढदिवसाला शाळेला 5100 रु देणगी दिली.त्याचबरोबर जामोद ग्रामपंचायत सदस्य प्रेमकुमार जयस्वाल यांचा 18 ऑक्टोबर ला वाढदिवस असल्याने त्यांनी 3100 रु देणगी दिली तर 19 ऑक्टोबर ला जळगांव जा येथील बालरोगतज्ञ डॉ.सतीश शिरेकार यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी 11000 रु देणगी दिली.अशाप्रकारे गेल्या 3 दिवसात शाळेला जवळपास 20,000 देणगी प्राप्त झाली असून समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येऊन शाळेबद्दल विश्वास दाखवत आहेत.