जळगाव जामोद प्रतिनिधी:-
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनल यांचे संयुक्त कार्यालय जळगांव जामोद येथे सुरु करण्यात आले तसेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देश सेवा करत असताना भारतीय सेनाचे जळगांव जामोद येथील जवान मारोती किसन म्हस्के ज्यांची 2002 साली भारतीय सेने साठी निवड झाली व 2019 साली लान्सनायक म्हणून रिटायरमेंट झाली ज्यांनी आसाम, जममु काश्मिर,राजस्थान व भारतीय शांती सेनेच्या वतीने इस्राईल या ठिकाणी 2009 साली सेवा दिली.देश सेवा करत असताना 2018 मध्ये राजस्थान येथील जेसलमेर या ठिकाणी युद्ध अभ्यासा दरम्यान त्यांना कायमचे दोन्हीं पायांना अपंगत्व आले असे भारतीय सेना जवान मारुती किसन म्हस्के यांचे हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे व सत्य पोलीस टाइम्सचे डिजिटल मीडिया न्युज चॅनल चे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ संजयजी कुटे मा आमदार जळगांव जामोद विधानसभा यांच्या पत्नी सौ अपर्णा ताई कुटे, सौ सिमाताई डोबे (नगराध्यक्षा नगर परिषद जळगाव जामोद), सौ स्वातीताई वाकेकर(सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी), श्री प्रसेनजित पाटील (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रा.काँग्रेस कमिटी), श्री दत्ताभाऊ पाटील(शिवसेना सहसंपर्क प्रमुख), सौ लताताई तायडे(जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी भाजपा),श्री डॉ संदीपजी वाकेकर (बालरोग चिकिस्तक स्पंदन हॉस्पिटल जळगाव जामोद) ,श्री तुकारामजि काळपांडे( शिवसेना उपजिल्हा प्रमुख), श्री अभिमन्यु भगत (जेष्ठ पत्रकार दै दिव्य मराठी)श्री नामदेवराव उमाळे(जेष्ठ पत्रकार) ,श्री वीरसिंगजि राजपूत(मलकापूर आजतक चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष)श्री गजानन भाऊ ठोसर(मनसे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार) श्री राजूभाऊ राऊत(मनसे तालुका अध्यक्ष) ,श्री आशिष सारसर(नगरसेवक न.प जळगाव जामोद), श्री नागेश भटकर(मनसे शहर अध्यक्ष), या प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले व उद्घाटन साठी लाभलेले मारुती किसन म्हस्के भारतीय सेना जवान यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स संस्थापक अध्यक्ष व मुख्य संपादक यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रमाचे संचालन शुभम उमाळे प्रास्ताविक रोहित चोपडे (कार्यकारी संपादक सत्य पोलीस टाइम्स तथा उपाध्यक्ष प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे जिल्हा) व आभार प्रदर्शन राहुल ताठे(उपसंपादक सत्य पोलीस टाइम्स तथा कार्याध्यक्ष प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ) यांच्या हस्ते करण्यात आले.वरील प्रमुख पाहुण्यानि प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनल ला अभिनंदन करत पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या तसेच नेत्र तपासणी साठी लाभलेले जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध डॉ नंदकिशोर तायडे व रक्तदान शिबीर साठी लाभलेले अकोला डायग्नोस्टिक सेंटर ब्लड सेंटर व कम्पोनेट युनिट यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले व नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराला सुरुवात केली यामध्ये रक्तदात्यांनी आपले मोलाचे योगदान देऊन 39 बॉटल रक्त देऊन सहकार्य केले तसेच नेत्र तपासणी साठी आलेले आलेले 191 जेष्ठ नागरिक महिला व पुरुष यांनी आपला सहभाग नोदविला त्यापैकी 78 नागरिक हे मोतीबिंदू ग्रस्त असून त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनल हे त्यांना मार्गदर्शन करून ऑपरेशन चि व्यवस्था करणार आहे. व इतर नागरिकांना तज्ञ डॉ च्या सल्यानुसार औषधि चे वितरण केल्या गेले.कार्यक्रमाप्रसंगी श्री संजयजी कुटे मा. आमदार जळगांव जामोद मतदार संघ विधानसभा सदस्य यांच्या पत्नी सौ अपर्णाताई कुटे, सौ सीमाताई कैलास डोबे नगराध्यक्ष नगरपरिषद जळगाव जामोद ,सौ स्वातीताई संदीप वाकेकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सौ लताताई तायडे जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी भाजपा, श्री प्रसेनजित पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, श्री दत्ता भाऊ पाटील शिवसेना सहसंपर्कप्रमुख, मलकापूर आज तक चे संपादक तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वीरसिंग राजपूत ,डॉ संदीप वाकेकर बालरोग तज्ञ स्पंदन हॉस्पिटल जळगाव जामोद, तुकाराम काळपांडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, गजाननभाऊ ठोसर मनसे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार,राजुभाऊ राऊत मनसे तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत, जेष्ठ पत्रकार नामदेव उमाळे,आशिष सारसर नगरसेवक न.प जळगाव जामोद, नागेश भटकर मनसे शहर अध्यक्ष, आकाश उमाळे पत्रकार, वृत निवेदीका निकिता म्हसाल्,जन पंचायत न्यूज़ चे प्रतिनिधी विठ्ठलभाऊ गावंदे शहर प्रतिनीधी योगेश म्हसाळ, वैष्णवी उमाळे व उपस्थित जेष्ठ नागरिक,महिला व पुरुष ,व युवा उपस्थित होते तसेच संपूर्ण कार्यक्रमाला अतुल दंडे (हिंदवी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष) व त्यांच्या सहकारी मित्रानी श्रमदानं करून मोलाचे सहकार्य केले.
