--परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शेती मशागतिसाठी कोनोविडरचा वापर केल्यास पैसा व श्रमाची बचत होते":-वैभव जाधव---


जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-

भात पिकांमधील अंतर्गत खुरपणी साठी फारच खर्च येतो. रासायनिक खत आणि खुरपणी वर होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्च सुद्धा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे खिशाला झळ पोहोचते.कोनो विडर या अत्याधुनिक यंत्रामुळे भात पिकांमधील तण सहज कमी करता येते, आणि त्यात तनाचा प्रत्यक्षरीत्या हिरवळीचे खत म्हणून शेतकऱ्यांना वापर सुद्धा करता येते. त्यामुळे रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चात सुद्धा कपात होते. ह्या यंत्राच्या वापराने शेतकऱ्यांच्या शर्माची व पैशाची अधिक बचत होते. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक अशा कोनो विडर यंत्राचा तन नियंत्रणासाठी वापर करावा ,असे आवाहन कृषी अभियांत्रिकीचे अभ्यासक वैभव जाधव यांनी केले आहे. ते आपल्या परिसरातील भात उत्पादक शेतकर्‍यांसमोर दिनांक ३सप्टेंबर रोजी आंतर मशागत  करिता कोण वापरल्यास पैसा व श्रमाची बचत होते ह्या विषयावर बोलत होते. प्रा.वैभव जाधव यांनी अलाहाबाद कृषि विद्यापीठातून एम.टेक.(फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनियरिंग) ही पदवी प्राप्त केली असून त्यांच्या कृषी शिक्षण व अनुभवाचा फायदा निश्चितच आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना होईल.कृषी क्षेत्रात वेळोवेळी बदल घडतात, बहुतेक वेळा हा बदल शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असतो.हे सिद्ध होते. असाच बदल भात लागवडीत झाला आहे.वास्तव, भात लागवड करणे हे खूप मेहनतीचे मानले जाते.तण उपटण्याच्या प्रक्रियेत भरपूर मानवी श्रम लागतात आणि ही प्रक्रिया अनेक दिवस चालत राहते . पण आता कोनो विडरचा वापर धानाची तण काढण्यासाठी आणि खुरपणीसाठी केला जात आहे. हे जलद कार्य करते आणि जास्त मेहनत न करता पूर्ण होण्यास मदत होते. तरुणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पूर्ण विलर सारखी अत्याधुनिक यंत्र वापरावी असे आवाहनही वैभव जाधव यांनी यावेळी केले.कोनो विडर विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की कोनो वीडर हे व्यक्तिचलितपणे चालवलेले उपकरण आहे, जे मनुष्याला सहजपणे चालवता येते. या यंत्राचा वापर भात लागवळ झाल्या पासून २०ते२५ दिवसांनी खुरपणीसाठी करावा.भात पिकाची उभी पाने आणि खांबाच्या दरम्यान तण उपटून ते जमिनीत मिसळतात.जेणेकरून शेतकऱ्यांना शेतात हिरवळीचे खत मिळते.शेतकर्‍यांना शेतात रासायनिक खते कमी द्यावी लागतात.ज्या शेतकऱ्याच्या शेतात भात (पेरणीसाठी) कमी लागतो व उत्पादन अधिक होते.  त्या शेतकऱ्यानी ७ ते १० दिवसांच्या अंतराने धानाची खुरपणी करावी.कोनो विडर दोन कट रोलर्सपैकी एकाच्या मागच्या बाजूस लांब हँडल बसवले आहे.शंकूच्या आकाराच्या रोलच्या परिघावर सेरेटेड ब्लेड्स आहेत, एक फ्लोट समोर ठेवलेला आहे, ज्यामुळे युनिट जमिनीत बुडू नये.कोनो विडर तण काढण्याव्यतिरिक्त, याचा वापर हिरव्या खताचे पीक तुडविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.ते जमिनीवरील माती ला  व्यत्यय आणते, आणि वायुवीजन देखील वाढवते.शेत मशिनरी कोनो वीडर कमी वजनाचे असल्याने खेचण्यासाठी शेतकरी एक हात चा उपयोग पण करू शकतो, जेणेकरून शेतकरी सहजपणे सोप्या पद्धतीने खेचू शकेल. कोनो विडर  स्थायी स्थितीत चालविली जातात, कोनो विडर ( शेतकरी वर अवलंबून )ची कार्यक्षमता दररोज सुमारे ०.१८ हेक्टर आहे. कोनो वीडरची वैशिष्ट्ये विशद करतांना वैभव जाधव म्हणाले, त्यानेभाता मध्ये खुरपणी सहज करता येते., एक महिला सहजपणे हे उपकरण चालवू शकते., हे उपकरण जमिनीत तण चांगले मंथन करते.● या उपकरणांची किंमत कमी आहे जी शेतकरी सहज खरेदी करू शकतात.● शेतकऱ्यांच्या शेतात तण दाबून सेंद्रीय खत म्हणून काम करते. आपल्या शेतात कोण लीडर चा वापर करून श्रम व पैशाची शेतकऱ्यांनी बचत करून आधुनिक कृषी तंत्र विभागाची कास धरावी असेही त्यांनी म्हटले कोण लीडर आणि इतर कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाविषयी माहिती हवी असल्यास आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी  आपणाशी स्थानिक  कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्याल येथे संपर्क करावा असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

Previous Post Next Post