जळगाव जामोद शहरातील सुभेदार पुरा प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज पर्यंत नळयोजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्या करिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. करिता समाजवादी पार्टी जळगाव जामोद च्या वतीने दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी पाणीपुरवठा विभाग यांना निवेदन देऊन सुभेदार पुरा प्रभाग क्रमांक 4 मध्ये नळ योजना कार्यान्वित करावी करिता निवेदन देण्यात आले. सुभेदार पुरा क्रमांक प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोणतेही प्रकारची पाईपलाईन नाही त्यामुळे सुभेदार पुरा प्रभाग क्रमांक 4 मध्ये नवीन पाईपलाईन टाकावी व तेथील नागरिकांना कनेक्शन देऊन त्यांना होत असलेला त्रास कमी करावा अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद नफिज यांनी दिले आहे सदर निवेदन देतेवेळी जहीद खान,सैय्यद कमर,अनीस जमदार,सैय्यद गफुर,शेख अलताफ,आबीद खान,रीजवान खान,युसुफ खान यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
जळगाव शहरातील सुभेदार पुऱ्यामध्ये पाण्याची पाईपलाईन कार्यान्वित करा- समाजवादी पार्टीचे निवेदन..
जळगांव जा.प्रतिनिधी:-